सोयाबीन पीक व्यवस्थापन

0

  सोयाबीन हे आपल्या महाराष्ट्रतील महत्वाच्या तेल बीया पिकांपैकी एक पीक आहे . सोयाबीन पिकामध्ये १९%खाद्यतेल आणि ४०% प्रथिने असल्यामुळे जागतिक स्तरावर देखील सोयाबीन पिकास एक महत्वाचे स्थान आहे . एकूण जे तेल उत्पादन होते त्यामध्ये जवळजवळ ५८% तेलाचा वाटा  हा एकट्या सोयाबीन पिकाचा आहे तसेच ६०% प्रथिने सोयाबीन पिका पासून उपलब्ध होतात . कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन  देणारे नगदी पीक असल्यामुळे सोयाबीन लागवडीच्या क्षेत्रामध्ये झपाट्याने वाढ होत आहे . 

            सोयाबीन पिकाचा वापर हा तेलबीया पीक मनून तर होतोच पण त्या व्यतिरिक्त सोया बिस्कीट ,सोयावडी ,सोयामिल्क ,तसेच जनावर आणि कुकूटपालनासाठी सोयाबीन च्या पेंडीचा पौष्टीक आहार मनून देखील उपयोग केला जातो. सोयाबीन झाडाचा पालापाचोळा जमिनीवर पडल्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यासाठी मदत होते तसेच जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होते जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता देखील वाढते. 

मध्यम ते भारी पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन तसेच गाळाची जमीन सोयाबीन पिकासाठी उत्तम असते . जास्त पाणी धरून ठेवणाऱ्या जमिनीत किंवा ज्या जमिनीत पाणी जास्त साठून राहते अश्या जमिनी मध्ये सोयाबीन पिकाची उगवण चांगली होत नाही . ज्या जमिनीचा सामू ६ते ७. ५ च्या आसपास आहे त्या जमिनीमध्ये सोयाबीन पीक उत्तम येते. 

सोयाबीन पीक हे खरीप हंगामामध्ये  मुख्यत्वे घेतले जाणारे पीक आहे. उष्ण हवामान पिकाला चांगले मानवते. तापमान १८ते ३५ अंश से. मध्ये सोयाबीन पिकाची वाढ चांगली होते. सोयाबीन पिकास वार्षिक ६०० ते १००० मी. मी. पर्जन्यमानाची आवश्यकता असते . 

जमिनीची खोलगट नांगरणी करून उभ्या आणि आढाव्या कुळवाच्या पाळ्या द्याव्या .शेवटची कुळवणी करण्याआधी शेणखत किंवा व्हर्मिकंपोस्ट एकरी १ते २ टन टाकावे . हंगामात नंतर बियाणातील तेल सामग्री वाढवण्यासाठी गरज असल्यास ८-१० किलो गंधक द्यावे. बियाणे आणि खत देण्याच्या यंत्रात व्यवस्तीत मिसळून घ्यावे जमिनी पासून ५-७ सें. मी. खोल टाकावे.  

उगवणीच्या काळात बुरशीजन्य रोगापासून संरक्षण होण्यासाठी जैविक किंवा रासायनिक बुरशीनाशकाचा वापर करावा त्यासाठी प्रति किलो बियाणास २ते २.५ ग्राम बाविस्टीन व ४ग्राम ट्रायकोडर्मा या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी . बीजप्रक्रिया करते वेळी बियाणे हलक्या हाताने चोळावे. 

बीज प्रक्रिया करते वेळी प्रथम रासायनिक बुरशीनाशक चोळावे व नंतर जैविक बुरशीनाशक वापरावे. 

-बियाणे आणि उगवून आलेल्या रोपांची आंतरप्रवाही सुरक्षा 

-सोयाबीन पिकाची एकसमान उगवण क्षमता 

-मुळांचा उत्तम विकास व हिरवेगार पीक 

-पिकाच्या सुरवातीच्या अवस्तेमध्ये रस शोषक कीड तसेच खोडकीड पासून संरक्षण 

– वातावरणांतिल बदलाचा जास्त परिणाम पिकावर दिसून येत नाही 

-पिकाची गुणवत्ता आणि उत्पादन वाढण्यास मदत होते तसेच उत्पादन खर्चात बचत होते. 

-शिफारशीत प्रमाणात औषधींचा वापर केल्यास पर्यावर व जमिनीस सुरक्षित

-पिकाचा अजैविक ताण सांभाळते 

स्वच्छ मजबूत जमिनीवर ३०किलो बियाणे एकरी घ्यावे . 

-प्रति किलो बियाणासाठी २ते २. ५ ग्राम बाविस्टीन हलक्या हाताने चोळावे . 

-आवश्यकतेनुसार पाणी द्राव्यात मिसळून बियाणांवर वापरावे . 

-हातमोजे घालून द्रावण बियाणांवर चोळावे व एकसमान आवरण होईपर्यंत प्रक्रिया सुरु ठेवावी बीजप्रक्रिया झालेले बियाणे वाळवण्यासाठी पसरून ठेवावे . 

-सामान्य पद्धतीने पेरणी करावी 

जे.एस.-३३५,एम. ए. यू.एस.-७१,एम. ए. यू.एस.-८१,एम. ए. यू.एस.-१५८,फुले कल्याणी डी. एस. २२८,जे.एस.-९३-०५,जे.एस ९७-५२,एम. ए. सी. एस. -५८,एम. ए. सी. एस.१२४

सोयाबीन ची पेरणी जमिनी मध्ये पुरीशी ओल असताना करावी त्यासाठी वाफशावर पेरणी करावी 

-पेरणी १५जून ते १ जुले दरम्यान करावी 

-पेरणी चे अंतर ४५x ५cm  असावे 

-बियाणे ३-५ cm पेक्ष्या खोल जाऊ नये जेणेकरून उगवण होण्यास त्रास होणार नाही 

सोयाबीन पिकास हेक्टरी ५०kg  नत्र +७५kg स्फुरद +३०kg गंधक पेरणीपूर्वी किंवा पेरणी च्या वेळी द्यावे तसेच सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता भरून काढण्यासाठी सूक्ष्म अन्न द्रव्याची बॅग टाकावी माती परीक्षन करून खत व्यवस्थापन केल्यास अतिरिक्त खताचा वापर टाळता येऊ शकतो. 

सोयाबीन पिकात सुरवातीचे ६-७ आटवड्यामध्ये तण वाढण्याचे प्रमाण जास्त असते . २०-३० दिवसांनी कोळपणी तर ४५ दिवसांनी दुसरी कोळपणी द्यावी त्याच बरोबर गरजेनुसार १-२ खुरपण्या देऊन पीक तन विरहित ठेवावे तसेच तन नियंत्रणाच्या दृष्टीने रासायनिक तणनाशकाचा वापर हा तन नियंत्रणासाठी करता येतो . बाजारात तन उगवून येण्या अगोदर चे तन नाशक आणि उगवून आल्या नंतर अशे दोन्ही तन नाशक उपलब्ध आहेत. 

सोयाबीन पिकावर प्रामुख्याने सुरवातीच्या अवस्थेमध्ये चक्रीभुंगा, खोडकिडा यांचा प्रादुर्भाव आढळून येतो . त्या व्यतिरिक्त उंट अळी ,पाने गुंडाळणारी अळी, तंबाखू वरील पाने खाणारी अळी ,केसाळ अळ्या, शेंगा पोखरणारी अळी,या किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो . त्याच प्रमाणे रस शोषक किडीमध्ये मावा,तुडतुडे, पांढरी माशी,या रसशोषक किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. 

   रसशोषक किडी आणि किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी किडीची संख्या आणि आर्थिक नुकसानीची पातळी लक्ष्यात घेऊन शिफारशीनुसार रासायनिक कीटकनाशकाचा वापर करावा. त्या बरोबर च सोयाबीन पिका मध्ये झिंक आणि फेरस या दोन सुक्ष्म अन्न द्रव्याची देखील कमतरता ओळखून ती भरून काढणे महत्वाचे आहे. 

     किडीसोबतच सोयाबीन पिकावर मूळकूज , शेंगा वाळणे,तांबेरा ,हळद्या , मोझाईक व्हायरस या रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो. रोगाचे नियंत्रण करण्यासाठी रोग प्रतिकारक्षम वाणांची निवड करावी बियाणे पेरते वेळी बियाणाला बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी रोगाचा प्रादुर्भाव ओळखून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने योग्य ती फवारणी घ्यावी 

सुधारित वाण आणि सुधारीत तंत्रज्ञानाचा वापर करून योग्य वेळी योग्य नियोजन केल्यास सोयाबीन पिकाचे हेक्टरी २५-३० क्विन्टल उत्पादन घेता येते 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *