रशियाने खतांवरील डिस्काउंट केले कमी, खतांच्या किमती वाढणार ?
एक आश्चर्यकारक वळण ! रशियन खत कंपन्यांनी यापूर्वी भारताला दिल्या जाणाऱ्या खरावरील डिस्काऊंटवर यु टर्न घेण्याचा निर्णय घेतला आहे. DAP सारख्या खताच्या जागतिक किमती वाढत असताना रशियन कंपन्यांनी भारताला दिले जाणारे डिस्काउंट कमी करण्याचा निर्णय घेतला आह.
या बदलामुळे संपूर्ण भारतातील कृषी क्षेत्रात लहरीपणा येण्याची दाट शक्यता सांगण्यात येत आह. यापूर्वी भारत सर्वात जास्त चीन कडून खतांची आयात करीत असे परंतु रशियातून मिळणाऱ्या डिस्काउंट मुळे मागील वर्षी भारताची रशियाकडून खरेदी जवळपास २४६ टक्क्यांनी वाढली होती, परंतु जागतिक बाजारातील वाढत्या किमती मुळे आता चीन हि बाहेर देशांना खत पुरवठा करणार नाही, याचा परिणाम म्हणजे भारतात खतांच्या किमती वाढू शकतील अथवा सरकारवर अतिरिक्त अनुदानाचा बोझा पडेल.
सण २०२२-२३ मध्ये रशियाने डिस्काउंट वर खते पुरवठा केल्यावर भारताने तब्बल ४.३५ दशलक्ष मेट्रिक टॅन इतकी खते आयात केली होती व हि फक्त रशियाकडू DAP , युरिया यासारख्या खताला दिल्या जाणाऱ्या डिस्काउंट मुळेच “पूर्वी रशियन कंपन्या DAP ला ८० डॉलर पर्यंत डिस्काउंट देत होत्या पण आता त्या ५ डॉलर हि कमी करायला तयार नाहीत” असे एका अधिकाऱयाने बोलताना सांगितले.
या घटनाक्रमामुळे येणाऱ्या हंगामात शेतकऱ्यांवर खतांच्या वाढीव किमतीचा भर पडतो कि काय याची भीती आहे
1 thought on “रशियाने खतांवरील डिस्काउंट केले कमी, खतांच्या किमती वाढणार ?”