सोयाबीनची सर्वात जास्त उत्पादन देणारी जात कोणती ?
सोयाबीन च्या वेगवेगळ्या जाती व उत्पादन क्षमता
सध्या शेतकऱ्यांमध्ये सोयाबीन च्या नवीन नवीन जाती वापरण्याची जणू स्पर्धाच झाली आहे. अनेक शेतकरी नवीन जातीचा वापर करून विक्रमी त्पादन सुद्धा काढत आहेत पण त्याच वेळेस काही शेतकरी नवीन जातींचा वापर केल्यानंतर फसवणूस झाल्याची भावनाही व्यक्त करीत आहेत. कारण , ज्या त्या शेतकऱ्याची जमीन , पाण्याची सोय, फवारण्या, हवामान या सर्व गोष्टींचा एकंदरीत परिणाम म्हणजे उत्पादन आहे. त्यामुळे एकाच जाती बद्दल शेतकऱ्यांचे वेग वेगळे मत असू शकते.
या लेखातून कृषी विद्यापीठात घेण्यात आलेल्या चाचण्या आणि कमानी चे डेमो प्लॉट व शेतकऱ्यांच्या यशोगाथा यांचा एकंदरीत अभ्यास करून सोयाबीन ची जात व त्याचे सरासरी उत्पादन सांगण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु वर नमूद केल्या प्रमाणे अणे नैसर्गिक व कृत्रिम घटकामुळे यात बदल पडू शकतो याची नोंद घ्यावी.
S.r | जात | कालावधी | सरासरी उत्पादन ( हेक्टरी ) | वैशिष्ट्ये |
१. | एमयुएस – ६१२ | १००- १०५ | २०-२५ | झाडाची उंची ४० ते ४५ सेंमी ., १०० दाण्याचे वजन ११ ते १३ ग्रॅम , तेलाचे प्रमाण २०. ४९ टक्के , प्रथिनाचे प्रमाण ४१. ७५ टक्के . |
2. | पिडिकेव्ही एलो गोल्ड ९७ ( एएमएस -१००१ ) | ९७ | ३ दाणे प्रती शेंगाचे प्रमाण जास्त , प्रथिने व तेलाचे प्रमाण इतर वाणाच्या तुलनेत जास्त. | |
3. | जे. एस. -३३५ | ९५-१०० | २५-३५ | शेतकरी बांधवामध्ये सर्वात लोकप्रिय वाण, आंतरपिकास योग्य, ( १०० दाण्याचे वजन = ११ ते १२ ग्रॅम ) |
४. | जे. एस. – ९३- ०५ | ९०-९५ | २०-२५ | न पडणारे व शेंगा न फुटणारे वाण. |
५. | जे. एस-९५-६० | ८२-८८ | १८-२० | लवकर तयार होणारे, जाड दाणा व चार दाण्याच्या शेंगा ( २०-२५ टक्के ) |
६. | एमएयुएस – ७१ | ९३-१०० | २०-३० | शेंगा न फुटणारे वाण, अर्वषणास प्रतिकारक्षम. |
७. | एमयुएस -१५८ | ९३-९८ | २०-२२ | २ ते ३ दाण्याच्या शेंगा, १०० दाण्याचे वजन १० ते १२ ग्रॅम. |
८. | डीएस – २२८ | ९५-१०० | मध्यम आकाराचे दाणे, १०० दाण्याचे वजन १४ ग्रॅम , तेलाचे प्रमाण १७ ते २५ %. | |
९ | जे एस २०३४ | ८७ | २२-२५ | अति लवकर येणारे वाण, हलकी ते माध्यम जमिनीसाठी योग्य |
१० | डी एस बी २१ | ९०-९५ | २५-३० | ताबोरा रोगास प्रतिकारक्षम |
११ | MAUS १६२ | १००-१०३ | २५-३० | फिक्कट जांभळी फुले , २ ते ३ दाणे असलेली शेंगा, पिवळा दाना |
१२ | फुले संगम | ९७ | २०-२५ | जांभळ्या रंगाची फुले, तेलाचे प्रमाण १८. टक्के, प्रथिनांचे प्रमाण ३८. ४ टक्के, चमकदार पिवळा दाना. |
वरील तक्त्याचा वापर करून आपल्या जमिनीला तसेच वातावरणाशी मिळते जुळते वाण निवडणे महत्वाचे आहे.
निष्कर्ष:
कोणाच्याही सांगण्यावरून सोयाबीन ची जात न निवडता आपल्या गरजेनुसार वसोयाबीन जातीची निवड करावी
संदर्भ:
Mahabeej