फ्रेंच न्यायालयाने दोन ग्लायफोसेट आधारित तणनाशकांच्या विक्रीवर घातली बंदी
काही वन्यजीवांना उत्पादित केलेल्या रसायनांचा काही परिणाम होतो का याचे स्पष्ठ विश्लेषण न केल्यामुळे फ्रेंच न्यायालयाने स्विस केमिकल ग्रुप सिंजेंटाने उत्पादित ग्लयफोसेट घटक असलेल्या दोन तणनाशकांच्या विक्रीवर बंदी घातली आहे.
सप्टेंबर 30, 2020 रोजी फ्रेंच आरोग्य सुरक्षा एजन्सी ANSES ने Touchdown Systeme 4 या रासायनिक उत्पादनाचा विक्री करण्याचा परवानाच नूतनीकरण न केल्याचे न्यायालयाने दिलेल्या निर्णयातून दिसून येत आहे.
शेतकरी तन नियंत्रणासाठी वेगवेगळ्या रकासायनिक तणनाशकांचा वापर करीत असतो. पण हा वापर करीत असतानाच या उत्पादनामुळे निसर्ग व आपल्या आसपासच्या पर्यावरणावर काही याचा वाईट परिणाम होतो का याचे भान ठेवणेही तितकेच महत्वाचे आहे नाहीतर वन्य प्राणी किंवा पर्यावरणास हानी झाल्यास संपूर्ण निसर्ग चक्र बिघडण्याची शक्यता असते