कमी पाण्यावर घ्या हि उन्हाळी पिके Unhali pike…

0
unhali pike

सध्या, परतीचा पाऊस जोरदार न झाल्यामुळे महाराष्ट्रात जवळपास सर्वत्रच पाण्याची टंचाई भासत आहे. असे असताना खोडवा ऊस जोपासण्यासाठी सर्वच शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे बरेच शेतकरी खोडवा ठेवण्याच्या मनस्थितीत नाही. तर, सध्या अगदी कमी पाण्यावर कोणती उन्हाळी पिके Unhali pike घ्यावी यावर आपण चर्चा करू.

उन्हाळी पिके ( Unhali Pike)

उन्हाळी पिकात २ प्रकारची उन्हाळी पिके असे वर्गीकरण करता येईल

साधी उन्हाळी पिके व भाजीपाला उन्हाळी पिके

साधी उन्हाळी पिके (sadhi unhali pike)

यात प्रामुख्याने कमी कालावधी असणारी किंवा कमी पाण्यात येणारी साधी पिके म्हणजेच भाजीपाला सोडून येणारी इतर पिके असणार आहेत.

मूग (Moog farming) :

मूग हे खरीप तसेच उन्हाळी हंगामात घेतले जाणारे पीक आहे. मुग पिकाचा कालावधी हा सरासरी ७० दिवसाचा असल्याने अगदी कमी पाण्यात हे पीक घेता येते.

कालावधी : ६५ ते ७० दिवस

उत्पन्न : सरासरी अंदाजे १० ते १२ क्विंटल / हेक्ट.

बियाणे प्रमाण : एकरी ५ ते ७ किलो बियाणे पुरेशे होते

तीळ (Til farming):


कालावधी : सरासरी ८३ ते ९५ दिवस फेब्रुवारी पहिल्या आठवड्यास शिफारस
झाडाची उंची ७४ ते १२५ से मी. तेलाचे प्रमाण ५१ ते ५३ %.

उत्पन्न : सरासरी ७ ते ८ क्विंटल / हेक्ट.

भूईमूग (Groundnut Farming) :

महाराष्ट्रात उन्हाळी हंगामात भुईमुगाच्या काही जातींची शिफारस केली आहे. हलक्या व मध्यम जमिनीत हे पीक चांगल्या प्रकारे घेता येते.

कालावधी : भुईमुगाच्या विविध जातीनुसार त्यांच्या कालावधीत बदल होत असतो. काही जातींचा कालावधी हा ८५ ते ९० दिवस तर काहींचा १०० ते १२० दिवस असतो. आपल्या पेरणीच्या तारखेनुसार जातींची निवड करावी.

बियाणे प्रमाण : एकरी सरासरी ४० आलो बियाणे पुरेसे होते तर टोकन पद्धतीचा अवलंब केल्यास २५ किलो बियाणे पुरेशे होईल.

खते: पेरणी करताना ५० किलो डी ए पी + ३ किलो थायमीट पेरावे

भाजीपाला उन्हाळी पिके (Bhajipala Unhali Pike)

मेथी ( Methi/ Fenugreek Farming):

अत्यंत मोजक्या पाण्यावर तसेच अत्यंत लवकर येणारे पालेभाजी पीक म्हणून बरेच शेतकरी मेथी पिकास प्राधान्य देतात.

कालावधी : २५ ते ३२ दिवस

बियाणे प्रमाण : एकरी सरासरी ५० किलो ( पेरणी साठी )

पाणी नियोजन : मेथीस अत्यंत कमी पाणी लागत असले तरी , योग्य पाण्याचे नियोजन आवश्यक आहे. रेन पाईप किंवा मिनी स्प्रिंकलर पद्धतीने पाणी दिल्यास अधिक मानवते. श्यकतो उन्हाळ्यात दिवसा म्हणजेच उन्हात पाणी देणे टाळावे

आता रोग ओळखण्यासाठी पिकांच्या पानाला लागणार इलेक्ट्रॉनिक चिप

कोथिंबीर ( kothimbir/ Coriender Farming) :


मेथी प्रमाणेच कालावधी कमी असल्याने कोथिंबिरीस कमी पाणी लागते ( जमिनी नुसार) तर उन्हाळ्यात चांगले व स्थिर भाव असण्याची शक्यता देखील असते. शेतकऱ्यांनी चालू भाव व मार्केट चा अभ्यास करून ओथिंबीर पेरणीचा निर्णय घ्यावा.

कालावधी : ३२ ते ४० दिवस

बियाणे प्रमाण: एकरी सरासरी ३० ते ४० किलो पर्यंत बियाणे लागते. पेरणी च्या पद्धतीनुसार बियाण्याचे प्रमाण कमी अधिक होऊ शकते.

पाणी नियोजन : मेथी प्रमाणेच कोथिंबिरीस भर उन्हात पाणी देणे हानिकारक ठरते. त्यामुळे मिनी स्प्रिंकलर किंवा रेन पाईप च्या साह्याने सकाळी अथवा संध्याकाळी पाणी द्यावे.

काकडी ( Kakadi/ Cucumber Farming):

उन्हाळ्यात बऱ्याचदा काकडीचे भाव चांगले मिळण्याची शक्यता असते परंतु मार्केट चा अभ्यास करूनच निर्णय घ्यावा .

कालावधी : पहिला तोडा हा सरासरी ४२ दिवसात चालू होतो.

बियाणे प्रमाण : संकरित काकडी लागवडी साठी लागवडीच्या अंतरानुसार बियाणे प्रमाण निश्चित करावे. एकरी सरासरी २०० ग्राम बियाणे पुरेशे होते.

लागवड पद्धत : काकडी मल्चिंग पद्धतीने केल्यास कमी पाण्यात अधिक उत्पादन शक्य आहे, मल्चिं वापरणे शक्य नसेल तरीही हे पीक घेता येते. २ ओळीतील अंतर ५ फूट तर २ रोपातील अंतर १.५ ते २ फूट या पद्धतीने लागवड झिगझॅक पद्धतीने करू शकता.

पाणी नियोजन : काकडीस पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केल्यास अधिक फायदा होतो. पिकाच्या वाढीनुसार वेगवेगळ्या खतांच्या मात्रा देण्यास अधिक फायदेशीर ठरते.

 इलेक्ट्रिक वाहनांवरील सबसिडी संपणार?

रोबोटिक शेती : भविष्याची शेती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *